RationHelp वर आपले स्वागत आहे!
येथे तुम्ही महाराष्ट्रातील रेशन कार्ड e-KYC Status, Pending List, नावांची अद्ययावत माहिती, तसेच रेशनशी संबंधित विविध मार्गदर्शक माहिती सहज पाहू शकता.
आमच्या वेबसाइटद्वारे आपण:
RationHelp हे एक माहिती देणारे प्लॅटफॉर्म आहे. येथे उपलब्ध माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून, आम्ही कोणतेही अधिकृत सरकारी पोर्टल नाही.
RationHelp ही महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक नागरिकांना रेशन कार्डाशी संबंधित माहिती सहजपणे पाहता यावी, यासाठी तयार केलेली मदतनीस माहिती-आधारित वेबसाइट आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना e-KYC स्थिती, प्रलंबित यादी (Pending List), रेशन कार्डातील नावे, तसेच अद्ययावत माहिती एका ठिकाणी सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे.
सरकारी माहिती समजून घेणे अनेकांना कठीण जाते—म्हणूनच आम्ही तीच माहिती स्पष्ट, साधी आणि मोबाईल-फ्रेंडली स्वरूपात नागरिकांसमोर आणतो.परंतु आम्ही केवळ सार्वजनिकपणे उपलब्ध सरकारी डेटाचा संदर्भ घेऊन नागरिकांना उपयुक्त सेवा देण्याचा प्रयत्न करतो.
आमची वचनबद्धता:
सध्या अनेक नागरिकांचे रेशनकार्ड eKYC पूर्ण न झाल्यामुळे त्यांची नावे eKYC pending यादी मध्ये आहेत. आमच्या वेबसाईटवर गावाच्या यादीनुसार उपलब्ध करून दिली आहे, जेणेकरून नागरिक आपल्या नावाची यादीत खात्री करू शकतील. यादीत आपले नाव आढळल्यास, तातडीने जवळच्या सेवा केंद्रात जाऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, ही विनंती.
आमचा उद्देश फक्त माहिती देण्यापुरता नसून, नागरिकांपर्यंत ती वेळेत पोहोचवण्याचा आहे – जेणेकरून कोणतेही लाभ थांबू नयेत.
"माहिती हक्क, तुमच्या हक्कासाठी!"अनेक वेळा नागरिकांना याबाबत माहितीच नसते आणि त्यामुळे त्यांचे शासकीय लाभ थांबतात.आम्ही या समस्येची दखल घेऊन, गावागावातील नागरिकांना त्यांच्या रेशनकार्ड eKYC झाली कि नाही माहिती देण्याचे काम करत आहोत.